कोल्हापूर : मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत. ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं, असं म्हणत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थेट कर्जमाफी दिली पाहिजे. ठाकरे सरकारनं असं केलं नाही. तर उधारीची कर्जमाफी केली आहे. सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांना फायदा होणार नाही. ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळायला हवा. सद्यस्थितीत कर्जमाफीची सर्वात जास्त गरज अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना आहे. सरकारने सातबारा कोरा करण्याचं जे आश्वासन दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्याला आज तात्काळ मदतीची गरज आहे. उधारीच्या मदतीची गरज नाही, असंही फडणवीस म्हणाले. ते कोल्हापूरात बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
-कटक वनडेत भारताचा विराट विजय; 2-1 ने जिंकली मालिका
-ही माती माझी ओळख सांगते, जितेंद्र आव्हाडांनी कवितेतून दर्शवला नागरिकत्व कायद्याला विरोध
-महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या विश्वासघाताची मालिका कायम ठेवली- चंद्रकांत पाटील
-शेतकऱ्याचं कर्जमाफ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची मोठी घोषणा