मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यात 35 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा केला आहे. या गुंतवणुकीमुळे सुमारे 24 हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात, असं म्हणत स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल. https://t.co/1G0vsMNEBy
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
ऋतुराज गायकवाड युवा विराट कोहलीसारखा वाटतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ स्टार खेळाडूचं मत
“माणुसकीचा फ्रीज, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा नवा उपक्रम”