दुबई : चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 9 विकेट्सनी विजय मिळवत आयपीएल 2020 हंगामाचा शेवट विजयाने केला. या विजयात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करताना नाबाद 62 धावांची खेळी करत चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्वाचे याेगदान दिले. तर त्याचा सलामीवीर साथीदार फाफ ड्यु प्लेसिसने 48 धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर ड्यु प्लेसिसने ऋतुराज गायकवाडचे तोंडभरून काैतुक केलं.
हा आमच्यासाठी अत्यंत निराशाजनक हंगाम होता. पण, आम्ही शेवटचे 3 सामने सलग जिंकत या हंगामाची विजयी सांगता केली. ऋतुराज गायकवाड युवा विराट कोहलीसारखा वाटला ना? मला त्याचे दबावात खंबीरपणे उभे राहणे आवडले., असं म्हणत ड्यु प्लेसिसने गायकवाडचे काैतुक केलं.
दरम्यान, ते उच्च दर्जाचे क्रिकेट खेळू शकतात का हे पाहण्यासाठी हीच गुणवत्ता तुम्ही या युवा खेळाडूमध्ये पाहू शकता, असंही ड्यु प्लेसिस म्हणाला.
महत्वाच्या घडामोडी-
“माणुसकीचा फ्रीज, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा नवा उपक्रम”
एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा- अतुल भातखळकर
पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश