मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून भाजपानं पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकांना काय वाटतं यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू, यावर ठाकरे सरकारचा भर असतो, असं म्हणत राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर निशाणा साधलाय.
महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारच्या भूमिका पूर्णपणे बदलल्या आहेत. पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारी लोकं आता मंदिर उघडण्यापासून का दूर जात आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारनं नियमावली बनवून मंदिर उघडणं अपेक्षित होतं, परंतु दुर्देवानं सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.
मंदिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. नियमावली बनवून मंदिरं उघडण्यास काही हरकत नाही, परंतु हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे. लोकांना काय वाटतं यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू, यावर सरकारचा भर असतो, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सरकारनं मंदिरं उघडली नाहीत आणि राज्यभर ‘मंदिर खोलो’ आंदोलन सुरू झालं, तर भाजपा त्यांच्यासोबत उभी राहिल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहिल, असा इशाराही प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी-
“लोणावळामध्ये ढाक भैरव येथील 200 फूट दरीत कोसळून पिंपरी चिंचवडमधील युवकाचा मृत्यू”
‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन
सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना टोला
ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता- टाॅम मुडी