मुंबई : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेनचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
एक लक्षात घ्यावे सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करतील. आचार्य आत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, याद राखा!, असं म्हणत सामनातून लक्ष्मण सवदी यांना टोेला लगावला आहे.
सूर्य-चंद्राच्या साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेवारी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास शिवसेनेने अग्रलेखात व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे., असंही सामनाने म्हटलं आहे.
दरम्यान, सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज काय?, असा प्रश्नही सामनातून यावेळी उपस्थित करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी-
ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता- टाॅम मुडी
पॅट कमिंसची घातक गोलंदाजी; कोलकाताची राजस्थानवर 60 धावांनी मात
“नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करतायत”
“एकनाथ खडसे यांचा जळगावकडे परतत असताना अपघात”