देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती मी समजू शकतो- जयंत पाटील

0
524

मुंबई : मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असं म्हणत राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील बैठक पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरं काहीही काम नाही. त्यातच त्यांच्या मनासारखं काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असं जयंत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना आता याच्याशिवाय दुसरं काही काम आहे का?, ते बिचारे अस बोलणारच. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानभुती आहे. ताळमेळ नसल्यामुळं आमचं सरकार फार काळ टिकणार नाही मात्र आमचं सरकार थोडं-थोडं दिवस करून पाच वर्ष पूर्ण करणार अहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेल नसल्यानं हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं फडणवीस पालघरच्या भाजप मेळाव्यात म्हटलं होतं. यावर जयंत पाटलांनी पलटवार केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचा ‘हा’ आमदार नारज; राजीनामा देणार असल्याच्या चर्चा

-वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवलं आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सत्तेत बसवलं- देवेंद्र फडणवीस

-“भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळून लावला”

-“भीमा कोरेगाव हिंसाचाराला देवेंद्र फडणवीस यांची फूस होती”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here