“देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे”

0
180

जळगाव :  भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते देवेंद्र फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे… आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी देवंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल गोटे यांनी एक पत्रक काढलं आहे.

भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात तसंच गृहमंत्री अमित शाहांना ‘मोटाभाई’ म्हणतात, असं अनिल गोटेंनी म्हटलं आहे.

भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले, असंही अनिल गोटे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला”

लायकी पाहून बोलावं; सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते- अजित पवार

भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करतात- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here