करोनाची लागण झालेले रुग्ण आरोपी नाहीत, त्यांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी

0
284

मुंबई : करोनाची लागण झालेले रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

करोनाची लागण झालेले रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. त्यांना HIV सारख्या रोगाचीही लागण झालेली नाही. त्यांची नावं जाहीर केल्यास जनजागृती वाढेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

जी लोक करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आली आहेत त्यांनाही माहिती मिळेल आणि जागरुक होतील. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय गरजेचं असल्याचंही संदीप देशपांडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“…तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो”

संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला ‘हा’ मोलाचा सल्ला

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच निधन

“सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटलेत; राष्ट्रवादीचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here