मुंबई : काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणे पितापुत्रांवर टीकास्त्र सोडलं होत. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राणेंच्या टीकेवर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
ज्या शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना मुख्यमंत्री केलं, पूर्ण हयात सत्ता दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत नारायण राणे यांनी खंजीर खुपसलं. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारायच्या?, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, नारायण राणे ज्या संस्कृतीत वाढले त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? ते अशाच पद्धतीने बोलतात. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. ते आणि त्यांची मुलं कुणाचीही लायकी काढणं, खाली पाडून बोलणं यामध्ये धन्यता मानतात, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत; नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही- नारायण राणे
देवेंद्र फडणवीसांबाबत असं बोलणं योग्य नाही- रोहित पवार