राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ आमदार देणार राजिनामा

0
556

बीड : महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारावर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हेही मंत्रीमंडळाच्या विस्तारावर नाराज आहेत. प्रकाश सोळंके हे उद्या राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पक्षाकडून वारंवार टाळाटळ होते. याचा वीट आला आहे. यावेळी शेवटची टर्म म्हणून मतदार संघात समोर गेलो होतो. चौथ्यांदा निवडून आलो. पण माझ्या बाबतीतच का डावललं जात समजत नाही, असं मत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलं आहे. ते news 18लोकामत या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके हे उद्या दुपारी 12 वाजता विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

-कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शपथविधीचा व्हीडिओ

-आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ!

-मिळालेल्या संधीचं सोनं करा, अजित पवारांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला

-…म्हणून रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here