अमित शहा आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील

0
195

मुंबई: नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील, असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे आणि मोेदी यांच्यामध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी राऊतच जबाबदार आहेत, असा आरोप ही शेलार यांनी केला आहे.

संजय राऊत यांचा आज (15 नोव्हेेंबर) वाढदिवस असतानाच वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.

दरम्यान, मुंबईत भाजपची कार्यकरणी बैठक सुुरु आहे. त्यावेळी शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here