“…त्यामुळे राज ठाकरेंना अटक करुन जेलमध्ये टाका”; अबू आझमी

0
402

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील. अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेश मनसैनिकांना दिला होता. यावरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी राज  ठाकरेंवर टीका केली आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीची मोठी खेळी; ‘हा’ माजी आमदार हाती बांधणार घड्याळ”

ज्या पक्षाला फार महत्त्व दिले जात नाही. ज्यांना जनाधार नाही. ज्यांच्या पक्षाचा फक्त 1 आमदार आहे. अशा नेत्यांचे लोकांनी का ऐकावं? अशा नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करुन वातावरण अशांत करण योग्य नाही. मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते, त्याला परवानगी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना अटक करुन जेलमध्ये टाका, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत अबू आझमी यांनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एसटी कर्मचाऱ्यांच्या सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची धडक; चप्पलफेकही केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here