कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. जवान जोतिबा चौगुले हे जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये रविवारी रात्री अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. ते उंबरवाडी गावचे रहिवासी आहेत.
शहीद झाल्यानंतर दोन दिवसानंतर जोतिबा चौगुले यांचं पार्थिव मूळगावी आणण्यात आलं आहे. आज शहीद जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवान जोतिबा चौगुले यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या गावातील लोकांनी चौगुले यांना आलेल्या वीरमरणाचा अभिमान व्यक्त केला आहे.
दरम्यान, जवान जोतिबा चौगुले यांच्या गावातल्या तरुणांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-भाजप सरकरमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं- पृथ्वीराज चव्हाण
-” सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करण्यापासून भाजपला कोणी रोखलं होतं?”
-डॉ. लागू यांच्या निधनानं ट्वीटरवर हळहळ व्यक्त
-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं निधन