Home महाराष्ट्र राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता शरद पवार उतरले मैदानात, म्हणाले…

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता शरद पवार उतरले मैदानात, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आणि फैजल यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे. हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्याच्या हे सर्व विरोधात आहे. आपल्या लोकशाही संस्थांचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचं म्हणत शरद पवार यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

आपली राज्यघटना प्रत्येक व्यक्तीच्या न्याय्य न्यायाच्या अधिकाराची हमी देते. विचार स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता आणि प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाची खात्री देणारा बंधुभाव,., असंही शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

“उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच होईल”

ठाकरे-फडणवीस यांची ‘एकत्र’ विधानभवनात एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण