जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

0
245

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. यानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच आणि किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी निशाणा साधला आहे.

प्रभाकर साईलने स्वतःचा व्हिडिओ शेअर करून एक मोठा गौप्यस्फोट केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत प्रभातर साईलचं काैतुक केलं आहे. वसुली गँग कुणाच्या होत्या. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा मी तुम्हाला लवकरच सांगेन., असं संजय राऊतांनी म्हटलं. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “उल्हासनगरमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप?; जयंत पाटलांनी केली ‘या’ नेत्यासोबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा”

जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. तसेच न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते जय हिंद.. असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

मनसे- शिवसेना पुन्हा आमने-सामने; ‘या’ कारणासाठी दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष

“गोव्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालाय, किरीट सोमय्याजी गोव्याची गाडी पकडा, गोवा युझ काॅलींग फाॅर यु”

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here