मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका करत कंगणा रणौतवर अप्रत्यक्ष निशाणा साधालाय.
उत्तर प्रदेशात माध्यमांना रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही? आणखी किती दिवस गप्प बसणार? की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे?,” असं सवाल रोहित पवार म्हणाले.
उत्तरप्रदेशात मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय!
यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?
आणखी किती दिवस गप्प बसणार?
की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय?— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज; महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे- यशोमती ठाकूर
“धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण”
“मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”