मुंबई : उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना युपी पोलिसांनी अटक केली. तसेच राहूल गांधी यांना युपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या टि.व्ही. 9 शी बोलत होत्या.
उत्तर प्रदेशमध्ये जे काही चाललेलं आहे की ज्याला अक्षरश: गुंडाराजच म्हणावा लागेल. एक आठवडाभर एक मागासवर्गीय मुलगी धडपत राहते आणि त्या ठिकाणी तिला न्याय मिळत नाही त्याच्यानंतर अचानकच तिचा मृत्यू झाला आणि नंतर तिला जाळून दिलं जातं मी अंतिम संस्कार त्याला म्हणार नाही. कारण ते फोर्सफुली केलं गेललं कृत्य त्या ठिकाणी होतं. आज सन्मानीय राहूलजी आणि प्रियांकाजी ज्यावेळेला त्यांना भेटायला गेले त्यांच्या फॅमिलीला त्यावेळेला 160 किलोमीटरच्या आधीच त्यांना रोखण्यात आलं. आता ते पायीपायी निघालेले आहेत म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराजच्या पलीकडे काहीच सुरू नाहीये., असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
महिलांसोबत अत्याचार होत आहेत. जिथं अत्याचार होत आहेत तिथं कोणी विचारायलंं गेलं तर ते त्यांना विचारू देत नाहीयेत. आणि अक्षरश: त्या ठिकाणी लोकशाहीचा खून होताना आपल्याला दिसतोय. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कुठंतरी बदललंही पाहिजे. त्या बेवस मुलीला जिवंत असतानाही अत्याचार झाला आणि मृत्यूनंतरही तिला तिच्या परिवाराला अत्याचाराला सामोरं जावं लागतंय हे खरोखरंय मानवतेच्या नियमामध्ये कुठेच बसताना दिसत नाही, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण”
“मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”
“हाथरसमधली घटना पाशवी; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?”