Home महाराष्ट्र सत्यजित तांबे प्रकरणावर आता बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सत्यजित तांबे प्रकरणावर आता बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय बनून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या सर्व प्रकरणावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शुभांगी पाटील यांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यतीत करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. त्यामुळे याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…भाजपमध्ये आलोय, ही माझी अडचण; फडणवीसांच्या उपस्थितीत, भर सभेत ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

अजित पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला