“मनसेची मोठी खेळी; राष्ट्रवादीत गेलेल्या ‘या’ नेत्याचा पुन्हा मनसेत प्रवेश”

0
3186

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यातच मनसेनं आगामी नवी मुबई महापालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर मनसैनिक म्हणून ओळख असलेल्या श्रीकांत माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज ठाकरे यांनी पक्ष संघटना वाढवण्याकडे लक्ष घातलं असून राज ठाकरेंबरोबर त्यांचे पुत्र अमित ठाकरे सक्रिय झाल्याने तरुणांचा कल मनसेकडे वाढत चालला आहे. त्यातच अमित ठाकरे यांनी मोठी खेळी खेळत राष्ट्रवादीत गेलेल्या श्रीकांत माने यांचे मतपरिवर्तन करत त्यांना राष्ट्रवादीतून पुन्हा पक्षात घेण्यात यशस्वी ठरले आहे.

दरम्यान, अमित ठाकरेंच्या या मोठ्या खेळीमुळे आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाकडून छापे; अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरी तुमच्या पक्षावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही”

भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण मनसेची साथ हवीच?

शिवसेनेची अवस्था अत्यंत दयनीय, त्यांना चौथ्या क्रमांकावर जावं लागलं; प्रविण दरेकरांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here