Home महत्वाच्या बातम्या … तर मी भाजप सोडणार; उदयनराजेंचा मोठं वक्तव्य

… तर मी भाजप सोडणार; उदयनराजेंचा मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांवर सर्व स्तरावरून सडकून टीका करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही याच मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. यानंतरठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी केवळ भावूक होऊ नये तर खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. याबाबत आज उदयनराजे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी बघेल. वेळ प्रसंगी मी तेही करेल, असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा : दापोलीतील साई रिसाॅर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती; अधिकाऱ्याने केला खुलासा

उदयनराजेंच्या या विधानाने भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच राज्यपालांची हाकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही  करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून आज विकृतपणे सर्वधर्म समभावाच्या विचाराला नख लागत आहे. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. महाराजांचा अवमान झाल्यानंतर हे राजकीय पक्ष आज प्रतिक्रियाच देत आहेत. ठामपणे का भूमिका घेत नाही, असं उदयन राजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधून मोर्चाची हाक दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“काहीही झालं तरी अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार; वाढदिनी ‘या’ मोठ्या नेत्याचा शब्द”

“मोठी बातमी! मुंबईत ‘या’ दिवसापासून तब्बल 13 दिवस संचारबंदी; वाचा काय सूरू, काय बंद”

“अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मोठा घोषणा”