पुणे : मुंबई-बेंगलार महामार्गावर डाॅक्टर दाम्पत्त्यांना दोघा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडचा सव्वा लाखाचा ऐवज लुटला. याप्रकरणी डाॅ.चिन्मय विठ्ठल देशमुख (वय.32, रा.राजर्षी शाहू सोसायटी, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबई-बेंगलार महामार्गावर साताऱ्याकडून पुण्याकडे येत असताना नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली. डाॅ. देशमुख हे पत्नीसह साताऱ्याहून पुण्याकडे येत होते. नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर लघुशंका आल्याने डाॅ. देशमुखांनी कार थांबवली. त्याचवेळी दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यांनी कारजवळ त्यांच्या पत्नीच्या पोटाजवळ बंदूक ठेवून पैशांची मागणी केली. डाॅक्टर व त्यांच्या पत्नीकडील 2 तोळ्यांच्या अंगठ्या, घड्याळ असा 1 लाख 20 हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर तो दोघे पळून गेले. हा प्रकार मध्यरात्री 12.30 वाजता घडला.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम.डी.पाटील हे करत आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
भाजप शिवसेनासोबत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
राहूल टेवाटिया व संजू सॅमसन यांची दमदार अर्धशतके; राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय
“ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम”