मुंबई : शिवसेनेचं 25 ते 30 वर्षे भाजपसोबत युती करुन राजकारण सुरु होतं. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना होती, ही त्यांची मजबुरी होती का.. असं म्हणत भाजपचे परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत याच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेची नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का..याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांच्या अलिकडच्या काळातील वक्तव्यावरून दिसून येते, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला आहे- गुलाबराव पाटील
मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यामध्ये आंदोलन
हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर…; रावसाहेब दानवेंचा टोला
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन- पंकजा मुंडे