कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया; मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा

0
154

मुंबई : कोरोनावर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असं आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबूया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजुला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करुया., असं मुख्यमंत्री म्हणाले.

गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. तसेच या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा., असं उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“पंढरपूरमध्ये फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी; भाजपलाही पावसाच्या चमत्काराची आस”

जे राजकारण सुरू आहे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, लोकांचा जीव महत्त्वाचा- आदित्य ठाकरे

हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय; गाण्यातून आनंद शिंदेंचा फडणवीसांना टोला

कर्णधार संजू सॅमसनची आक्रमक शतकी खेळी व्यर्थ; पंजाब किंग्सचा शेवटच्या चेंडूवर विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here