Home अमरावती “मोहित कंबोजनी 3 बँकांना चुना लावलाय; रोहित पवारांचं प्रत्युत्तर, 52 कोटींचाही केला...

“मोहित कंबोजनी 3 बँकांना चुना लावलाय; रोहित पवारांचं प्रत्युत्तर, 52 कोटींचाही केला उल्लेख”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणात एकापाठोपाठ सलग पाच ट्विट केले होते. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शिंदे गट भाजपमध्ये होणार विलीन?; वाशिम मध्ये लावलेल्या भावना गवळींच्या बॅनरवरुन चर्चा

मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. ते बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते.

जेव्हा त्यांनी ट्वीट केले, तेव्हाच मी मोहीत कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओव्हरसीज बँकेत 52 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. सामान्य लोकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असेल तर त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर..; राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

 शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

खरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?, शर्मिला राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…