वकिलाची कमाई वर्षाला ₹374 कोटी? प्रतिज्ञापत्रात समोर आले धक्कादायक आकडे..!

0
126

📰 सुप्रीम कोर्टाचे  प्रसिद्ध वकील

 

  • Abhishek Manu Singhvi यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची आणि कुटुंबाची प्रचंड संपत्ती जाहीर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार सिंघवी कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे ₹2,500 ते ₹2,800 कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

• वार्षिक उत्पन्न:

2024-25 या आर्थिक वर्षात सिंघवी यांचे उत्पन्न सुमारे ₹374 कोटी इतके असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

• मागील पाच वर्षांची कमाई:

गेल्या पाच वर्षांत त्यांनी ₹1,500 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न कमावल्याचे जाहीर केले आहे.

• गुंतवणूक आणि मालमत्ता:

सिंघवी यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक म्युच्युअल फंड, AIF आणि PMS फंडांमध्ये असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडे ₹25 कोटींपेक्षा अधिक किमतीची पेंटिंग्ज आणि आर्टवर्क आहेत.

• क्रिप्टो आणि रोख रक्कम:

प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सुमारे ₹8 कोटींची क्रिप्टोकरन्सी असून जवळपास ₹69 लाख रोख रक्कम आहे.

• स्थावर मालमत्ता:

* महाराष्ट्रातील अलिबाग (नागाव बीच) येथे सुमारे 1 एकर जमीन

* दिल्लीतील मेहरौली परिसरात 2.5 एकर जमीन, ज्याची किंमत अंदाजे ₹60 कोटी असल्याचे नमूद केले आहे.

• दागिने:

सिंघवी यांच्या पत्नींकडे ₹150 कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने-चांदी व दागिने असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

• कर्ज नाही:

महत्त्वाची बाब म्हणजे सिंघवी यांनी कोणतेही कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

👉 सुप्रीम कोर्टातील आघाडीचे वकील आणि राजकारणी म्हणून ओळख असलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांची जाहीर केलेली ही संपत्ती सध्या राजकीय आणि कायदेवर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here