राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

0
1470

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का?, या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

दोन्ही भावंडं एकत्र आल्यास आनंदच होईल. कितीही मतभेद असले तरी संकटकाळात ठाकरे कुटुंबीय एकत्र येते हे सर्व महाराष्ट्र जाणतो. समोरून एकत्र येण्यासंदर्भात साद आल्यास राज ठाकरे नक्कीच विचार करतील, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. यावरून आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “मोहित कंबोजनी 3 बँकांना चुना लावलाय; रोहित पवारांचं प्रत्युत्तर, 52 कोटींचाही केला उल्लेख”

शर्मिलाताई ठाकरे काय बोलल्या हे मी ऐकलेलं नाही. दुसरी गोष्ट कोणाशीही युती वगैरेसारख्या विषयावर बोलणं हे माझ्यासारख्या माणसासाठी योग्य नाही पण आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सगळ्या बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. या अशावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा राहू पाहत आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

जर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा राग, रोष मनामध्ये न ठेवता या प्रसंगामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहीले तर त्याचा निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आनंदच होईल, असंही भास्कर जाधव म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गट भाजपमध्ये होणार विलीन?; वाशिम मध्ये लावलेल्या भावना गवळींच्या बॅनरवरुन चर्चा

बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर..; राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

 शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here