बाळासाहेबांनी ज्यांचा सन्मान केला त्यांच्यावर शिंतोडे उडवून शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह- आशिष शेलार

0
352

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने “पॉप डान्स” केला. तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात., असं म्हणत शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय ? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर “ट्रॅक्टर” फिरवणार का? असा सवाल शेलारांनी यावेळी शिवसेनेला केला.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा

सचिन तेंडूलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

“महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही”

फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here