राज ठाकरेंवर बोलावं इतकी संजय राऊत यांची पात्रता नाही; मनसेची टीका

0
562

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना  राज ठाकरे यांच्या केसालाही महाराष्ट्रात धक्का लागणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होत. त्यावरुन आता मनसे नेते गजानन काळे  यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

आम्ही राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सक्षम आहोत. संजय राऊत यांची पात्रता नाही की त्यांनी राज ठाकरेंवर बोलावं. तुम्ही संपादक कसे झाला आहेत. हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. आमच्या तोंडून सत्य बाहेर काढू नका, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : अयोध्या दाैऱ्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचा सल्ला

आज शिवसेनेचे एवढे मोठे नुकसान झाले. कट्टर शिवसैनिक आमदार लटके यांचे निधन झाले. त्यांना मनसेकडून आदरांजली वाहतो. मात्र शिवसेनेचे एवढे मोठे नुकसान झाले तरी कादर खान सामनावीर संजय राऊत यांनी आज राजकीय बोलणं टाळले असते तर चांगले झाले असते,  असं सांगतानाच त्यांच्यात सध्या कादर खान घुसला आहे. राष्ट्रवादीची सुपारी घेऊन ते दररोज काहीही बरळतात. त्याला काय करणार, असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कादर खानला सिनेमात जसे लोक कंटाळून टमाटर मारतात, तसे आपल्या पक्षात काय सुरु आहे याचा कानोसा घ्या, राऊत हा रोजचा तमाशा बंद करा, तुमच्या रोजच्या या बोलण्याला लोकं कंटाळली आहेत, अशी टीकाही गजानन काळे यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत

महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here