“उद्या ठाकरे सरकारमधील आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच; रिचेबल झाल्यानंतर सोमय्या उद्या बाॅम्ब फोडणार?”

0
277

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर किरीट सोमय्यांनी INS विक्रांतच्या नावाखाली 58 कोटी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. त्यानंतर सोमय्या गायब झाले आहेत. मात्र उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच, असा इशारा सोमय्यांनी यावेळी दिला. तसेच मी नाॅट रिचेबल का झालो होतो, याचं उत्तरही देणार असल्याचं सोमय्या म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून ‘या’ नाराज नेत्याने दिला राजीनामा”

दरम्यान, घोटाळेबाजांकडील पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे आणि ते माझं कर्तव्य असल्याचंही सोमय्यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीसजी आयुष्यभर हेच करणार आहात का?”; राष्ट्रवादीचा सवाल

आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं; म्हणाले…

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here