“सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न, पण…”

0
470

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नासल्याचा दावा विरोधकांकडून  सातत्याने केला जातो, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकार पाडण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहेत. हा प्रकार विरोधकांकडून अखंडपणे सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकेल,” असं शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

दरम्यान, कोल्हापुरात आल्यानंतर शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत होत असला तरी त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नाही असं शरद पवार यांनी म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय?- सुप्रिया सुळे

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?- शरद पवार

धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी- चित्रा वाघ

धनंजय मुंडेंबाबतचा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here