Home महाराष्ट्र धनंजय मुंडेंबाबतचा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

धनंजय मुंडेंबाबतचा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भौऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रेणू शर्मांनी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सत्यता पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळं आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता, असं शरद पवार म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार मागे घेतली

नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली- अजित पवार

महापालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड सुरू करणार- आदित्य ठाकरे

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना करणार ‘इतक्या’ लाखांची मदत