मुंबई : आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. माझ्यावर एवढा राग का? नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणारा नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली होती, खडसेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका किंवा टिप्पणी करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की, ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणाबद्दल बोलतात त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेने त्यांच्यावर आरोप लावल्यावर मी स्वत: कमिटी तयार करुन 12 तासांत रिपोर्ट द्यायला लावला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 12 तासात खडसेंना त्यात क्लीन चीट मिळाली. भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं, कित्येक दिवस तो जेलमध्ये होता. त्या क्लीन चीटलाही ते ड्राय क्लिनर वैगेरे म्हणत असतील तर माहिती नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अभिनेत्री कंगना रणाैतची ड्रग्स प्रकरणी चौकशी होणार?; ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र
मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
…त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील