चंद्रकांत दादा, तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार, असं माझ्या कानावर आलंय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
1110

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत तुम्हाला याबाबत कळेल, असे विधान करुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

मला कळलंय की, चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असा मिश्कील टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. माझ्या कानावर असं आलंय की, चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना हसू आवरलं नाही, तसेच उपस्थित पत्रकारांनाही मुख्यमंत्र्यांनी हसायला भाग पाडलं.

महत्वाच्या घडामोडी –

युतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भाजपला खुली ऑफर; म्हणाले…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का; पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांचे पद रद्द

भाजपच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; किरीट सोमय्याची प्रतिक्रिया, म्हणाले…

चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊत म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here