माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला

0
327

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केलाय. यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलंय.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आणला. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते माझे मित्र आहेत. माझं नाव हे त्यांच्यासाठी झोपेची गोळी आहे. मित्राला माझं नाव घेतल्यावर चांगली झोप लागत असेल तर हरकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, ते 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्या ऐवजी त्यांनी 500 कोटींचा दावा दाखल करावा. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते, त्यासाठी व्हाईट मनी आहे का? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

साकीनाका बलात्कार प्रकरण! पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

कृष्णा नदीची पाणी पातळी उद्या 33 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता; पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरेंनी दिली माहिती

रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात FIR दाखल करणार- हसन मुश्रीफ

“काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here