अखेर “साईबाबा”सुधीर दळविंच्या पाठीशी. हाय कोर्टाच्या आदेशा मुळे ११ लाखाची मदत

0
69

मुंबई -:साईबाबांच्या रुपात लाखो भक्तांच्या मनात कायमच वसलेले ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात जीवघेण्या आजाराशी दोन हात करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या उपचारांनी त्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली असून कुटुंबासाठी ही लढाई दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. परिस्थिती इतकी गंभीर की पत्नीने स्वतः चाहत्यांकडे आणि सिनेसृष्टीतल्या लोकांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करावे लागले.

मात्र या हतबल क्षणी त्यांच्या मदतीला हात पुढे आला तो शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचा — आणि या दातृत्वाला मुंबई उच्च न्यायालयानेही आज हिरवा कंदील दाखवला आहे.

🔹 *हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

— उपचारांसाठी 11 लाखांची मदत मंजूर ट्रस्टने सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये खर्च करण्यास न्यायालयाची औपचारिक परवानगी मागितली होती, कारण पूर्वीच्या न्यायालयीन आदेशानुसार अशा मदताविषयक खर्चावर मंजुरी घेणे आवश्यक असते.

खंडपीठाने मागणी मान्य करत मदतीला मंजुरी दिली.

खंडपीठाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले —“साईबाबांची भूमिका साकारून दळवी यांनी भक्तिभावाचा संदेश देशभर पोहोचवला. अशा कलाकाराच्या उपचारासाठी मदत करणे हेच मानवतेचे कार्य आहे.”

🔹 क्षयरोग नव्हे — गंभीर संसर्ग सेप्सिस; उपचार लांबणार .दळवी 8 ऑक्टोबरपासून लीलावती रुग्णालयात दाखल आहेत.त्यांना Sepsis — जीवघेण्या संसर्गाने ग्रासले असून उपचार दीर्घकालीन आहेत.

पत्नीने दिलेल्या माहितीनुसार —

दळवी आता अंथरुणावर खिळले आहेत,2 केअरटेकर व फिजिओथेरपिस्टची सतत मदत,पूर्ण बरे होण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी,आजपर्यंत 10 लाखांहून अधिक खर्च झाला असून कुटुंब पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले.

🔹 पहिली मदत रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कडून… नंतर चाहत्यांचा वर्षाव

उपचारांसाठी 15 लाख मदतीची याचना करण्यात आली तेव्हा रिद्धिमा कपूर यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला. त्यानंतर अनेक चाहतेही आर्थिक मदतीला पुढे आले. पण उपचारांचा खर्च मोठा असल्याने संस्थानची मदत मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करावी लागली.

🔹 ‘साईबाबां’पासून ‘रामायण’पर्यंत — मोठी अभिनय परंपरा

ट्रस्टच्या वकिलांनी युक्तिवादात दळवींच्या उल्लेखनीय कारकिर्दीची आठवण करून दिली —1977 मधील शिर्डी के साईं बाबा चित्रपटाने घराघरात पोहोचले

रामानंद सागर – रामायण मध्ये महर्षी वशिष्ठ-:बुनियाद, भारत एक खोज, मिर्झा गालिब, चाणक्य, जुनून यांसारख्या सुपरहिट मालिकांमध्येही भूमिकात्यांचे संपूर्ण आयुष्य भारतीय भावविश्व, भक्ती आणि संस्कृती यांना समर्पित होते — आणि आज त्यांना मिळणारी मदत हे त्या योगदानाचे ऋणफेडण्याचे उदाहरण असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here