मोठी बातमी! करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी

0
518

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडले आणि, त्याहीपेक्षा नाट्यमय घटना म्हणजे ते पिस्तूल शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत टाकत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला.

काल करूणा शर्मांवर अॅट्राॅसिटीचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. यातच आता जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे करूणा शर्मा यांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, करुणा शर्मांवर अॅट्राॅसिटी आणि खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज आंबेजोगाई येथील जिल्हा न्यायालयासमोर उभं करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

महत्वाच्या घडामोडी –

बेळगावमध्ये भाजपने रचला इतिहास; महापालिकेवर भाजपचा झेंडा

करुणा शर्मा गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजपला धक्का! भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ आमदाराची शिवसेनेत होणार घरवापसी?”

मी वाघ आहे वाघ, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा; चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here