लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

0
401

नाशिक : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट नाशिकमध्ये येऊन महाविकास आघाडीतील  मंत्र्यांची आणि नेत्यांची चिंता वाढवली.किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील 12वा खेळाडू कोण आहे? असा प्रश्न पत्रकारांनी सोमय्यांना विचारला. यावर, ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्र बंदिवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरेंच्या नावावर- आशिष शेलार

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; ‘या’ भाजप खासदारचा दावा

“शिवसेना स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष”

सरकारच्या नाकावर टिच्चून दहिहंडी फोडली; मनसेचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here