नारायण राणेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले…

0
472

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाचव्यांदा पुणे दौऱ्यावर आहेत . त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला . यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रेबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी नारायण राणेंवर बोलणं टाळलं.

पत्रकार परिषद संपत आली असताना एका पत्रकाराने राज ठाकरे यांना नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत सवाल केला. तेव्हा, ऐ चल बस्स… असं म्हणत राज यांनी तो प्रश्न फेटाळला .

दरम्यान, आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुण्याच्या मनपा निवडणुकीसाठी मनसैनिकांमध्ये उस्ताह भरण्यासाठी राज मागील काही दिवसांपासून पुण्याचा सातत्याने दौरा करत आहेत. यापूर्वी 13 ऑगस्ट आणि त्याआधी 27 जुलै रोजी राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाॅप-5 मध्ये पटकावलं स्थान”

…तर मी त्याच दिवशी भाजपची खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजीराजेंचा मोठा गाैफ्यस्फोट

“भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक व शाईफेक”

“राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here