नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

0
146

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाईट कर्फ्यूची घोषणा केली. संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील   यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत. नाईट कर्फ्यू लावायला आम्ही नकार देत नाही. नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे. ते तुमच्यासोबत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. कोरोना संसर्गजन्य आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक- ममता बॅनर्जी

अमित शहा-शरद पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; जयंत पाटलांनी दिली माहिती

दीपालीच्या आत्महत्येला शिवकुमार एकटा जबाबदार नाही- चित्रा वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here