कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा

0
178

मुंबई : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी 31 मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी घटनेची गंभीर दखल घेत कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत एसओपी लागू करणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, औरंगाबादची घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांचा मिश्किली टोला

“सांगलीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याची हत्या”

“मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपशी माझा काही संबंध नाही”

शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल- राम कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here