‘त्यांना चपलेनं मारायचं’; जुना व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

0
306

मुंबई : औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमचा विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे यांनी ट्विटरवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा औरंगाबादमधील भाषणाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतराबाबत भाष्य केलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटलं की त्यांना चपलेनं मारायचं. त्यांना शेण खायायची सवय आहे, असं आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं- चंद्रकांत पाटील

“शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?; नामांतरावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here