के.एल.राहूल-रविंद्र जडेजाची वादळी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचे लक्ष्य

0
279

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 161 धावा केल्या. भारताकडून के.एल.राहूलने सर्वाधिक 40 चेंडूत 51 धावा, रविंद्र जडेजाने 23 चेंडूत 44 धावांची नाबाद आक्रमक खेळी करून भारताला 160 चा पल्ला गाठून दिला. तर संजू सैमसनने 15 चेंडूत 23 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून माॅयझेस हेनरिक्सने सर्वाधिक 3 विकेट, मिशेल स्टार्कने 2, तर अॅडम झम्पा व स्वीप्सनने 1 प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

हिंमत असेल तर एकएकटे लढा; चंद्रकांत पाटलांच महाविकास आघाडीला आव्हान

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही- एकनाथ खडसेंचा टोला

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती- सुप्रिया सुळे

‘ते’ मुख्यमंत्र्याचे काैतुक आहे की अब्रू काढणे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात- अतुल भातखळक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here