नया है वह’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..

0
242

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असा टोला लगावला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते ‘सीएनएन न्यूज 18 शी बोलत होते.

कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनुभवी नाही. पण, असं म्हटलं तर मी प्रौढ आहे. मी प्रत्येकाला मदत करणाऱ्यांसोबत उभं राहिलो आहे. मला अनुभव नसल्याचा आनंदच आहे. कारण माझ्या अनुभव नसण्याचा अर्थच असा आहे की, मी लोकांचा वंश, धर्म, जाती, लिंग, पंथ वा राजकीय रंग न पाहता त्यांच्यासाठी काम करत आहे,” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं.

द्वेष आणि असुरक्षिततेच्या भावनेतूनच विरोधी पक्ष महाविकास आघाडीविषयी ऑक्टोबरमध्ये सरकार कोसळणार असल्याच्या अफवा पेरत आहे. या तर्कामध्ये कसलेही तथ्य नाही. त्या फक्त अफवा आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मूळात आम्ही हे सगळं पाहत बसत नाही. त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही जे काही करतो त्यावर टीका करायला त्यांना आवडतं. पण तुम्ही सरकारविरुद्ध  बोललात, तर मग तुम्ही त्यांच्यासाठी देशद्रोही ठरता. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणं हाच उत्तम मार्ग आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

निष्णात वकिलांची टीम 27 तारखेलाही असेल; मराठा आरक्षणाची सुनावणी समाधानकारक- अशोक चव्हाण

राजकीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू नका; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

बारामतीकरांसाठी शरद पवार ठरले देवदूत; कोरोना रुग्णांसाठी केली ‘ही’ मोठी मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here