पंकजा मुंडे भाजपला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत… फेसबुकवर केली भावनीक पोस्ट

0
206

मुंबई : भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झालीय.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केल्यानंतर आपल्या ट्वीटवरून भाजप हा शब्द हटवल्याने त्या भाजप सोडजचिट्टी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?, अशी भावूक पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, आगामी काळात पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, अशी पोस्ट केल्याने आणि फेसबुक पोस्टमध्ये शेवटी ‘मावळे’ असा उल्लेख केल्याने त्या शिवसेनेत प्रवेश करणार असवल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here