शरद पवारांवर माझा पूर्ण विश्वास आहे- सोनिया गांधी

0
188

मुंबई : महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडली आहे. आज सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या भुमिकेमागे शरद पवारांचा हात आहे का? अश्या चर्चा सुरु आहेत. यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मत व्यक्त केलं आहे.

शरद पवारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. यापाठीमागे त्यांचा हात नाही, असं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनेसोबत असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार यांनी दुर्योधन आणि शकुनीमामासारखे काम केलं आहे. असं म्हणत सुरजेवाला यांनी टोला लगवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here