महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार? काँग्रेस फुटणार? ; देवेंद्र फडणवीसांच सूचक विधान

0
410

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत अधिकृतपणे नियुक्तीची घोषणा करण्यात आली. वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडलं त्यावेळी आम्ही शेवटपर्यंत ऐकत हेातो की, विधानसभेचे अध्यक्ष संग्राम थोपटे होणार, संग्राम यांचे नाव येणार. संग्रामभाऊंची चिठ्ठी झालीय, चिठ्ठी निघालीय, चिठ्ठीवर सही झालीय, चिठ्ठी दिल्लीवरून सुटलीय, पण त्यांच्या नावाची चिठ्ठी डिस्पॅच होता होता कुठे अडते, हे कळत नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : नितीन देसाईंच्या आत्महत्येवर, मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा, म्हणाला…

शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही, त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो, असं सूचक वक्तव्यही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याने काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार अशी चर्चा असतानाच संग्राम थोपटे यांना काँग्रेसकडून डावलण्यात येत असल्याबाबत देवेंद्र फडणवीसांकडून बोलण्यात आलं. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता संग्राम थोपटेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

 नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत, त्यांच्या बाॅडीगार्डने केला मोठा खुलासा, म्हणाला…

‘या’ माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी

“नितीन देसाईंच्या आत्महत्येवर, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, नितीनसारख्या माणसानं असं पाऊल उचलणं…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here