उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; आता शिंदेंचा पलटवार, म्हणाले…

0
187

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारच”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता, त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ही केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी माणसे आहेत,” असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे म्हणाले, बाहेर देता, तसं, काकांकडेही लक्ष द्या, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की, माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

 

महत्त्वाच्या घडामोडी –

भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करून चालणार नाही; शरद पवारांनी दिले बदलाचे संकेत

उद्धव ठाकरेंकडे उरलेले सर्व आमदार अमच्या संपर्कात; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here