“स्वतःचा पक्ष एका वर्षात बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत”

0
151

सिंधुदुर्ग : कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी केली होती. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

स्वतःचा पक्ष एका वर्षाच्या आत बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणे यांनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेला विसर्जित करण्याच्या ‘डराव डराव’च्या घोषणा यापूर्वी अनेकेवळा देण्यात आल्या. मात्र, ते शक्य झाले नाही. मुळात नारायण राणे यांनी असं स्वप्नचं पाहू नये. कारण, शिवसेनेशी स्पर्धा करण्याचे नारायण राणे यांचे दिवस कधीच निघून गेले आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

महत्वाच्या घडामोडी-

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार- वर्षा गायकवाड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल- प्रविण दरेकर

सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं; शिवसेनंचं राणेंना खुलं आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here