किरीट सोमय्या वेडा माणूस, स्वत: तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे ; संजय राऊतांची टोलेबाजी

0
239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी सोमय्या कोर्लईला जाणार आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोण आहे किरीट सोमय्या? सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे? बंगले शोधणार आणि घरे शोधणार, असा सवाल करतानाच भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांनाही स्वप्नात बंगले दिसत आहेत, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर शरद पवारांनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

दरम्यान, बंगले अदृश्य झालेत का? आम्हीही विचारतोय बंगले कुठे आहेत? सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्याची बेनामी प्रॉपर्टी कुठे असेल तर ते त्याला दिसत आहे. कागदपत्रं सरपंचांनी दिले आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन”

गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्यानं संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींना टोला

हिंगोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची वर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here