आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का?; आठवलेंच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

0
192

पंढरपूर : शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आठवलेंना  फटकारलं.

आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का? असा सवाल  करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेतही नाही आणि बाहेरही नाही, असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला. पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा  विश्वासही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

“राज्य सरकारकडून दसरा, नवरात्राैत्सवाची नियमावली जाहीर”

कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण “

आमच्यात मतभेद असलं तरी…; राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here